बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली |  केरळनंतर आता उत्तराखंडमध्येही पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामध्ये अनेक घरं आणि झाडे कोसळून पडले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. मंगळवारपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमधील रामगडपासून 6 किलोमीटर अंतरावरील सुकुना परिसरात रस्त्याची कामे करत असलेल्या 9 मजूरांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी भूस्खलनामुळे तेथे बांधलेल्या घराची भिंत कोसळ्याने हे मजूर ढिगाऱ्याखाली सापडले होते. त्यापैकी एक मजूर यातून कसाबसा वाचला आहे. रात्री झालेल्या घटनेनंतर एनडीआरएफची टीम लगेचच घटनास्थळी दाखल झाली. यातील तीन मजूर नेपाळ मधील होते. ते पौडी जिल्ह्यातील लॅन्सडाऊनजवळ राहत होते, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार जोगदंडे यांनी दिली.

नैनीतालमधील तलाव भरून वाहत असल्यामुळे तेथील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. भोवळी आणि हळदवाणी या दोन्ही भागामधून पाणी वाहत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 25 ते 30 नागरिक गेल्या 14 तासांपासून अडकले आहेत. त्यांना लष्काराच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

दरम्यान, मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या संकंटाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पावसाने माघार घेतली आहे. परंतु येत्या 24 तासात राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून मी माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव लिहिलंय’; भाजपच्या माजी खासदाराने सांगितलं गुपित

दोघात तिसरा आता सगळं विसरा! महिलेला चुंबन देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 882 रूग्ण

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More