नवी दिल्ली | उत्तर प्रदेश अत्याचाराच्या घटना वाढत असल्यामुळे चर्चेत आहे. माात्र अशातच भाजपचे वाराणसीमधील माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने छेड काढल्याचा आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
मायाशंकर पाठक एमपी इन्स्टिट्युट अँड कॉम्प्युटर कॉलेज या नावाने शिक्षणसंस्था चालवतात. पाठक यांनी पीडित विद्यार्थिनीला ऑफीसमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. पीडितेने घरी हे सर्व सांगितल्यावर रागावलेल्या कुटुंबियांन पाठक यांना चोप दिला.
कुटुंबियांनी आधी ऑफिसमध्ये त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर मैदानात आणून खुर्चीवर बसवून मारहाण केली. त्यानंतर त्यांना माफी मागायला सांगितली.
दरम्यान, व्हिडीओमध्ये पाठक आपल्या कानांना हात लावून माफी मागत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाला आहे.
#Varanasi #BJP के पूर्व विधायक #MayaShankarPathak ने की लड़की से छेड़खानी. हुई जमकर पिटाई.. pic.twitter.com/LDSKYwSft7
— Sonu Kanojia (@NNsonukanojia) January 10, 2021
संघ एवं भाजपा का असली चेहरा।
जो नारी का सम्मान नही करते वो भारत माँ का सम्मान क्या करेंगे ?
ये माया शंकर पाठक हैं । शिवपुर विधानसभा से दो बार के विधायक, पूर्व प्रदेश अध्यक्ष भाजपा और संघ के पदाधिकारी |
अपने कॉलेज मे नाबालिक लड़की को छेड़ने का मामला है|#MayaShankarPathak pic.twitter.com/EyPfXsc32r
— Vidushi (@shaktividhi) January 10, 2021
थोडक्यात बातम्या-
‘…तर भाजपच्या विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलियामध्ये सिराज आणि बुमराहच्या अपमानावर किंग कोहली भडकला; म्हणाला…
तुम्ही मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क यांना विकले गेले आहात- कंगणा राणावत
‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा