बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू

मुंबई | मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे विक्रोळीतील पंचशील नगर भागात पावसामुळे पाच-सहा घरांवर दरड कोसळली. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत.

मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळे शनिवारी रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 14 जणांना प्राण गमवावे लागले, तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिका आणि NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेलं असता तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलंय.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

थोडक्यात बातम्या- 

“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”

“अभिनय करून पोटापाण्याचं पहा, फार डोकं चालवू नका”

“योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच तर UP भाजपचे 160 आमदार बाद होतील”

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या लसीकरणबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल!

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More