नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियासमोर अजून अडचणी उभ्या राहणार असल्याचं म्हटलं जातंय.
कोहली नसताना चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी कोण येणार हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान यासंदर्भात भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांने भाष्य केलंय.
गौतम गंभीर म्हणाला, “माझ्या मताप्रमाणे अजिंक्य रहाणेने आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी खेळायला यायला हवं. जर गिल, के.एल राहुल यांना त्याच्याआधी संधी दिली तर यातून चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे.”
गंभीर पुढे म्हणाला, “रहाणेने 5 गोलंदाजांसह मैदानावर उतरायला हवं. रवींद्र जडेजाचा सध्याचा फॉर्म पाहता अजिंक्य सहज स्वतःला चौथ्या क्रमांकावर बढती देऊ शकतो.”
थोडक्यात बातम्या-
नाईट कर्फ्यूच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची घेणार भेट
पुण्यात पुन्हा दिसला गवा; वनविभागानं नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन
फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार
“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”
‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती