जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं मोदींच्या हस्ते लोकार्पण

गांधीनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं आज लोकार्पण करण्यात आलं. नर्मदेच्या किनारी हा दिमाखदार सोहळा पार पडला.

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया भागात हा पुतळा उभारण्यात आला आहे. 182 मीटर उंची असलेला हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे.

1 नोव्हेंबरपासून हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 500 रुपये तिकीट आकारलं जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र बनवलं जाणार आहे.

दरम्यान, ‘लार्सन अॅड टुब्रो’ कंपनीने या पुतळ्याचं काम केलं आहे. पुतळा साकारण्याची जबाबदारी मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून मी अंगावरचे कपडे काढले; ‘त्या’ मॉडेलचा खुलासा

-सिंचन घोटाळ्यातले दोषी वाचणार नाहीत- देवेंद्र फडणवीस

-भाजपला जोरदार धक्का; आजी-माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-मुख्यमंत्र्यांना इशारा देणाऱ्या रामभाऊंना तब्बल 81 दिवसांनी जामीन मंजूर

-भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी चक्क तक्रारदाराचे पाय धरले

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या