बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | कोरोना महामारीने देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. आपल्या देशाातील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे देशातील रूग्णांचे प्रचंड हाल झालेले आपण पाहिले आहेत. देशातील डाॅक्टर, नर्स, वैद्यकीय सेवा यांच्या पुरवठ्यावर सरकार सध्या लक्ष देत आहे. अशातच नर्सिंगच्या अभ्यासक्रमात नवीन गोष्ट समाविष्ट केली आहे.

इंडियन नर्सिंग काऊंसिंलद्वारे देशातील नर्सिंग अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेत नर्सिंगला महत्वाचं स्थान आहे. कोरोना महामारीने देशातील सर्व आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. परिणामी नर्सिंग व्यवस्था सुधारणा गरजेचं असल्याचं मत आएनसीने व्यक्त केलं आहे. देशातील एमबीबीएस शिक्षणाच्या समतुल्य शिक्षण आता नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मेडिकल एथिक्स म्हणजेच वैद्यकीय नैतिकता या विषयाचं शिक्षण देण्यात येणार आहे. याचा उद्देश हाच आहे की, देशातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल. फॉरेंसिक नर्सिंग या संशोधनात्मक विषय सुद्धा आता विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. फक्त 12 वी विज्ञान शाखा असलेल्याच विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगसाठी प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, देशातील सर्व बीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधीक सक्षम करण्याचा आमचा मानस असल्याचं मतं आयएनसीचे प्राध्यापक राॅय के जाॅर्ज यांनी व्यक्त केलं आहे. प्रॅक्टीकल पेपर पेक्षा लिखीत पेपर घेण्यावर आएनसी भर देणार असल्याचं जाहीर करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावे पंजाबला त्रास देऊ नये”

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर ‘या’ जिल्ह्यात बदली!

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?”

दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू- रुपाली चाकणकर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More