Top News राजकारण

समितीतील सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?; राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून आज राहुल गांधी निघून गेले. यानंतर काहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलंय.

या पत्राद्वारे राहुल गांधी यांनी सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याची तक्रार केलीये. समितीतील प्रत्येक सदस्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असायला हवा, असंही राहुल गांधी म्हणालेत.

“समितीचा सदस्य असल्याने एखाद्या विषयावर चर्चा असल्याल त्यावर मुद्दा उपस्थित करण्याचा मला अधिकार आहे. परंतु बैठकीत बोलू न देणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे. हे म्हणजे अधिकारांवर गदा आणण्यासारखं,” असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय.

संरक्षण विषयक संसदीय समितीची बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी बोलू न दिल्याने राहुल गांधी बैठकीतून निघून गेले.

थोडक्यात बातम्या-

बापरे! हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरने दिल्ली चक्क लाखो रूपयांची टीप

मेसेज आलेल्या व्यक्तीला दिली जाणार कोरोनाची लस; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे

कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या