मुंबई | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. बाळासाहेबांच्या या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपलाच सवाल केला आहे.
औरंगाबाद शहरात विकासाचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. परंतु भावनेचे राजकारण करुन त्याकडे निवडणुकीत जाणिवपूर्वक दुर्लक्ष करवलं जातं. पाच वर्ष भाजपचं सरकार होतं नामकरण करायला कोणी रोखलं होतं?, असा सवाल सचिन सावंतांनी भाजपला केला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एकत्रित पणे सहा महिन्यांपूर्वी चिखलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर करून मोदी सरकारकडे मान्यतेकरिता पाठवला आहे. चंद्रकांत पाटीलजी भाजपचे सरकार का मंजूर करत नाही, असंही सावंतांंनी म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याची मागणी शिवसेनेनेच आधी युतीमध्ये असताना केली होती. मात्र आता महाविकास आघाडीमधील काँग्रसने नामकरणाला विरोध असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एकत्रित पणे सहा महिन्यांपूर्वी चिखलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर करून मोदी सरकारकडे मान्यते करिता पाठवला आहे. @ChDadaPatil जी, भाजपा चे सरकार तो मंजूर का करत नाही?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 1, 2021
औरंगाबाद शहरात विकासाचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. परंतु भावनेचे राजकारण करुन त्याकडे निवडणुकीत जाणिवपूर्वक दुर्लक्ष करवले जाते. ५ वर्ष भाजपाचे सरकार होते. नामकरण करायला कोणी रोखले होते?
१. या महापालिका निवडणुकीत औरंगाबादकरांना आठ आठ दिवस पाणी मिळत नाही
२. रस्त्यावर पडलेली विवरे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 1, 2021
थोडक्यात बातम्या-
‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’; कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांना सुखद धक्का
सोशल मीडियावर दीपिकानं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैरा
“सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे, त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते”
“देवेंद्र फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून सरकारवर टीका करत असतात”
“ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला”