बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमच्यासारखी माणसं इथल्या मातीत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव”

नागपूर | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाडी भिडे यांनी वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसतं, असं खालच्या पातळीवरचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा बोडखे यांनी भिडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

संभाजी भिडे स्ञीत्व, अस्तित्व, मातृत्व हे शब्द तुमच्यासाठी फार अनाकलनीय आहेत, पेलणार नाही तुम्हाला, उच्चारू नका आणि नादीही लागू नका, जड जाईल. आज तुम्ही मातृत्वाच्या सन्मानाला धक्का लावला.. दुर्दैव तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत, असं म्हणत बोडखे यांनी टीका केली आहे.

जसं नपुंसकात पुरुषत्व कमी असतं, तस वांझेमध्ये स्त्रीत्व कमी असतं. त्यांना आपण नपुंसक आणि वांझ असे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.

दरम्यान, संभाजी भिडेंची बोलताना अनेकदा जीभ घसरली आहे. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं चमत्कारिक वक्तव्य त्यांनी यापूर्वी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More