बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

जयपूर | गेल्या काही दिवसांपासून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशातील अनेक राज्यात महिलांवर होणाऱ्या घरगुती अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशातच आता जयपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पिडीत महिलेने आपल्या पतीला झालेली घटना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

जयपूरच्या बागरू परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला. त्यानंतर ती आपल्या सासरच्या लोकांसह भाड्याच्या घरात राहत होती. दीड महिन्यापूर्वी पिडीतेचा घरी पती नसताना दिराने महिलेवर बलात्कार केला. याबाबत तिने कोणालाही सांगू नये म्हणून तुझ्या पतीला जिवे मारेन, अशी धमकी दिराने महिलेला दिली. त्या घटनेनंतर देखील दिराने महिलेवर 3-4 वेळा बलात्कार केला.

आपल्या पतीचा जीव धोक्यात असल्यानं महिलेने कोणालाही झालेला प्रकार सांगितला नाही. मात्र, काही काळानंतर तिला हा अत्याचार सहन न झाल्याने महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पती पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं.

दरम्यान, महिलेसोबत झालेला सर्व प्रकार पोलिसांनी सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दिराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

सुसाट सुटणार गाड्या… महामार्गावरील ‘हा’ नियम लवकरच बदलणार!

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More