बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ 7 गोष्टींचा समावेश

मुंबई | सध्या कामाच्या ताणानं आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरानं आरोग्याकडं दुर्लक्ष झालं आहे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही परिणामी डायबिटीज, शुगर या सारखं आजार उद्भवायला लागतात. परिणामी आरोग्याची काळजी घेण गरजेचं बनलं आहे. खासकरून तरूणांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही गोष्टीकडं लक्ष देऊ शकतो.

शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी डाॅक्टर आपल्याला तणावाच्या वातावरणापासून दूर रहाण्याचा सल्ला देतात. दररोज अंडी खाल्ल्यानं सुद्धा डायबिटीजचा धोका संभवतो. अंडी खाल्ल्यानं डायबिटीजचं होण्याचा धोका 60 टक्के संभवतो. एवोकाडोमध्ये खूप कॅलरी असते परिणामी डायबेटीजचा धोका वाढतो. कोबी हाय कार्बोहायड्रेटेड भाजी असल्यानं शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणाऱ्यांनी यापासून दूर राहणं गरजेचं आहे.

आपण आपल्या दैनंदिन आहारात पालेभाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर राहील. दररोज किमान एकदातरी पालेभाजी खायला हवी. कमी चरबीचे मांस खाल्यानं आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. आपल्या जेवणात कमी तेलाचा वापर करावा. सालमन टू फिशचा आपल्या जेवणात समावेश करावा.

दरम्यान, आपल्या आहारात सफरचंद आणि इतर फळांचा समावेश करावा. लसूण खाल्ल्यानं सुद्धा अनेक फायदे होतात. या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या आहारात करावा. आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी आरोग्याकडं लक्ष द्या.

थोडक्यात बातम्या 

फायनलपूर्वी कोलकाताच्या ‘या’ त्रिमुर्तीनं वाढवलं धोनी ब्रिगेडचं टेन्शन

“भाजपचे वायदे म्हणजे बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात”

महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वादात जावेद अख्तरांची उडी, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय”

“मला शिव्या दिल्या म्हणजे मतं मिळतील असा भाजपचा समज झालाय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More