बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

नवी दिल्ली | रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरुन जातो. स्वतःची काळजी घेण्यात कमी राहून जाते. त्यामुळे दिवसभर आळसल्यासारखं वाटतं, चिडचिड होते. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहण्यासाठी तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे.

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी, उत्साही राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या प्येयांचा समावेश करणं गरजेचं आहे. यामध्ये नारळ पाणी पिल्यानं दिवसभर शरिरात तजेलदारपणा जाणवतो. त्यामुळे दिवसभरात नारळ पाणी पिणं आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्यानं हिरव्या पालेभाज्यांपासून बनलेल्या स्मूदीचं सेवन करावं. याशिवाय सकाळी सकाळी उठल्यावर नाश्ता करणंही तितकच महत्वाचं आहे. दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची असल्यास नाश्ता करणे टाळू नका. त्याचबरोबर नाश्तात प्रोटीनचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास एनर्जी टिकून राहील.

दरम्यान, खाण्या-पिण्यांच्या सवयींसोबत पुरेशी झोपदेखील महत्वाची आहे. लवकर झोपणं आणि लवकर उठणंही आहाराएवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे दिवसभराची ऊर्जा टिकून राहते आणि फ्रेश जाणवतं.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदी आधीच केंद्राकडून अलर्ट जारी

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अनन्या पांडे हाजिर हो!, ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या अडचणी संपता संपेना

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More