पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने- चंद्रकांत पाटील

पुणे | राज्य सरकारने 23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला आहे, असा आरोप भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारने आज घाईगडबडीत ही अधिसू्चना काढून या गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे महापालिकेचं उत्पन्न घटलं आहे. मनपा हद्दीत या गावांची भर पडल्याने विकासकामांसाठी खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची तारांबळ होणार आहे. या गावातील नागरिकांची मात्र फरफट होईल. हे सरकारने लक्षात घेतले नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केला.

या गावांचा समावेश हा टप्प्याटप्प्याने करावा. तेथील नागरिकांची आणि प्रशासनाने केलेली मागणी लक्षात घेऊन गावांच्या विकासासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करुनच गावांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका होती, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

“जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही”

‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला दणका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या