बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

मुंबई | प्राप्तिकर विभागाने राज्यातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4.6 कोटी रुपये रक्कम आणि 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देण्यासाठी व सरकारी कामे करून देण्यासाठी हे रॅकेट पैसे घेत असल्याचं प्राप्तिकर विभागाने उघड केलं आहे.

हे सनदी अधिकारी चक्क मनासारखी पोस्टींग मिळावी यासाठी २०० कोटी द्यायला देखील तयार झाल्याचं समोर आलंय. प्राप्तिकरने 1 हजार कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघडकीस आणले आहेत. प्राप्तिकर विभागाने 23 सप्टेंबरला महाराष्ट्रातील काही व्यावसायिक, मध्यस्थी सरकारी अधिकारी यांच्यावर छापे टाकले होते. यावेळी 25 निवासी आणि 15 कार्यालयावर कारवाई केली होती.

ओबेरॉय हॉटेलमध्ये या रॅकेटमधील मध्यस्थांच्या अनेक बैठका होत असल्याचं समोर आलंय. अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणेेेेेेेे, मंत्रालयातील काम करून देणे या कामासाठी पैसे घेउन तो पुढे ठराविक लोकांना दिला जात असे. 10 वर्षापूर्वीच्या एका व्यवहाराचाही यामध्ये समावेश आहे. एकूण हा घोटाळा 1050 कोटी रुपयांचा असल्याचं प्राप्तिकर विभागाने सांगितलं आहे.

या घोटाळ्यातील पुरावे प्राप्तिकर विभागाने गोळा केलेेले आहेत. डिजीटल स्वरूपातील सर्व पुरावेही गोळा केले आहेत. व्हॉट्सअप चॅट, डिजीटल डेटा, पेन ड्राईव्ह, ई-मेल, फोन्स हे पुरावे गोळा करण्यात प्राप्तिकर विभागाला यश मिळाले आहे. या पुराव्यांच्या साहाय्याने अधिक तपास करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवार आयकर विभागाच्या रडारवर; आतापर्यंत कुठे कुठे पडल्या धाडी?

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 205 दिवसातील निच्चांकी नोंद

काय सांगता! गॅस सिलेंडर बुकींगवर चक्क मिळतंय सोनं

सोलापूर महानगरपालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढणार?

भारतीय जवानांची चीनवर कुरघोडी,चीनी सैनिकांचा ‘हा’ डाव उधळला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More