बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. आता राज्यातील काही मंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून छापेमारी होताना दिसत आहे. राज्यातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील या सर्व मंत्र्याचे निकटवर्तीय असणारे हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. आज दिवसभरात 40 विविध ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या असल्याची माहिती आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली आहे त्यांची नावे अनुक्रमे जयंत शाह, गिरीश पवाकर, प्रशांत निलावार आणि किर्ती कावेडिया यांचा यात समावेश आहे.

गिरीश कुमार यांच्या पत्नीला आयकर विभागातने ताब्यात घेतलं आहे. तसेच गिरीश कुमार आणि त्यांच्या पत्नीला आयकर विभागाच्या कार्यालयास घेऊन गेल्याची माहिती आहे. गिरीश पवार यांचे नरिमन पॉईटच्या अंबेसी सेंटरमधील घर आणि कार्यालय आहे, असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासुन देशातील विविध मोठ्या नागरिकांच्या घर, कार्यालयांवर ईडी आणि आयकर खात्याकडून चौकशी आणि छापेमारी होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी अभिनेता सोनु सुदवर आयकर खात्याकडून छापेमारी करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या –

”भाजपला 3 वर्षात देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

राष्ट्रवादीच्या महेबुब शेख यांना मोठा झटका, बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

“महिला सुरक्षेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील”

धक्कादायक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

काढणीस आलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतापले; सोशल मीडियावर पसरतोय #सोयाबीन ट्रेंड!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More