बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गरिबांचा मसीहा सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा, तब्बल 20 तास केली झाडाझडती

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरी आणि कार्यालयावर काल बुधवारी आयकर विभागानं छापे टाकले. सोनूच्या कार्यालयात आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून हा छापा टाकण्यात आल्याचं समजतंय. तब्बल 20 तास सोनू सूदच्या घराची झाडाझडती घेतली. अखेर आज पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी एक-एक करुन घरातून बाहेर पडले.

कोरोना काळात गरिबांचा मसिहा बनलेल्या सोनू सूदच्या घरी आयकर विभागानं छापा टाकल्यानंतर अनेकांच्या नजरा काय घडलं याकडे लागल्या आहेत. त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणांवर आयकर विभागानं ही छापेमारी केली आहे. मात्र कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आले नाहीत.

सोनू सूदनं अलीकडेच दिल्लीत आप सरकारच्या एका उपक्रमामध्ये ब्रँड अम्बासिडर होण्याची जबाबदारी उचलली आहे. कलम 133 एनुसार सुरू असलेल्या ‘सर्वे अभियानात’ आयकर अधिकारी केवळ व्यावसायिक भाग आणि त्याच्याशी संबंधित भागांची पाहणी करू शकतात.

दरम्यान, कोरोना काळात गरिबांसाठी, गरजूंसाठी सोनूनं खूप मदत केली. काहीही अडचणी उभ्या राहिल्या की लोक सोनूकडे मदतीची मागणी करत होते. सोनूही त्यांच्या या अडचणी सोडवण्यास तात्काळ हजर राहायचा. लोकांनी तर त्याला देव मानत त्याचं मंदिर देखील बांधलं. अनेकांनी त्याच्या नावाचे पुतळे उभारले. आता या आयकर विभागाच्या छापेमारीत पुढे काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या – 

चीनमध्ये डेल्टाचा धुमाकूळ; देशात पुन्हा दहशतीचं वातावरण

मोठी बातमी! एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी ‘या’ कंपनीने लावली बोली

टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली लोकांच्या’ यादीत मोदींसह या व्यक्तींचा समावेश

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More