बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

नवी दिल्ली | आयकर विभागाने उत्तर प्रदेशात तीव्र कारवाईस सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने आयकर विभागाने कारवाईंना वेग दिला आहे. आयकर विभागाने शिखर पान मसाल्याचे मालक पियुष जैन यांच्या घरात छापा टाकला होता. यावेळी या छापेमारीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढ्या नोटा सापडल्या, की त्या मोजण्यासाठी 4 मशिन मागवाव्या लागल्या आहेत.

पियुष जैन हे शिखर पान मसाला या कंपनीचे मालक आहेत. शिवाय कानपूरमधील कन्नौज येथे त्यांच्या परफ्युमचा देखील बिजनेस आहे. आयकर विभागाने एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबधित सर्व ठिकाणी छापा मारला होता. त्यानंतर जैन यांच्या कानपुर येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांना जवळपास 150 कोटी रुपये सापडले आहेत.

पियुष जैन यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ती मोजणं शक्य नव्हतं. शेवटी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशिन मागवून या नोटा मोजाव्या लागल्या. त्यामुळे सध्या या छाप्याची संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये चर्चा रगंली आहे. नोटा मोजून झाल्यानंतर पियुष जैन यांच्या घराभोवती पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, पियुष जैन यांची शिखर पान मसाला बनवाणारी कंपनी आहे. याव्यतिरीक्त त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. आयकर विभागाने आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित सर्व ठिकाणी छापा घातला होता. त्यानंतर थेट पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या त्यांच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात आयकर विभागाने 150 कोटी रक्कम जप्त केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, फोटो शेअर करत म्हणाले…

माया इथंच संपत नाही! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More