बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

नागपूर | नागपूर येथील एक आयकर अधिकारी उपचारासाठी महिला डॉक्टरकडे आला. त्याने उपचार करणाऱ्या तरुण महिला डॉक्टरला जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार करीत शारीरिक संबंधाचे मोबाईलने फोटो आणि व्हिडीओ काढले. ती गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरी गर्भपात केला. या प्रकरणी आयकर अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. सुथांदिरा पुन्नोस्वामी बालन असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आयकर आयुक्ताचे नाव आहे. तो सध्या बंगळूर येथे कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय डॉ. स्वीटी (बदलेले नाव) उत्तर नागपुरात राहते. 2019 मध्ये सुथांदिरा हा मानकापूरमधील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. याच कालावधीत स्वीटी ही मानकापूरमधील एका रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी होती. प्रकृती खालावल्याने सुथांदिरा हा रुग्णालयात गेला. यादरम्यान त्याची डॉ. स्वीटीसोबत ओळख झाली. स्वीटीनेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती सुथांदिरा याच्याकडे केली. त्यानो स्वीटीचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली.

विवाहीत असतानाही अविवाहीत असल्याचे सुथांदिरा याने स्विटीला सांगितले. तिला दहेगाव रंगारीतील सनराईज हाॅटेल अॅण्ड रेस्टाॅरंटमध्ये बोलाविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले. याचदरम्यान, ती गर्भवती झाली. सुथांदिराने तिला गर्भपात करायला लावला.

दरम्यान, सुथांदिरा विदेशात गेला. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क तोडला. मार्च महिन्यात स्वीटीने एनएडीटीची बेवसाइट तपासली. त्यात सुथांदिरा हा विवाहित असल्याचे तिला कळाले. तिने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाची खापरखेडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुंडलिक भटकर कसून चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

जोर लगाके हैशा! लोकं बघत राहिली पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं

नव्या फीचर्ससह शाओमी ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More