Income Tax Raid l राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आयकर विभागाने एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे छापेमारी केली आहे. या छापेमारीत अवैध संपत्ती उघड झाली आहे. यावेळी आयकर विभागाला तब्बल 25 किलो सोने, 4 कोटींची रोकड मिळाली आहे. मात्र आता या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाची मोठी कारवाई :
आयकर विभागाने देशभरातील 23 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी सुरु केली आहे. यावेळी राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यावेळी टीकमसिंह राव यांच्या घरी 4 कोटींची रोकड तसेच 18 कोटींचे 25 किलो सोने आयकर विभागाच्या हाताला लागले आहे. याशिवाय गोल्डन अँड लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून देखील कोट्यावधी रुपयांची कागदपत्रे मिळाली आहे.
यासंदर्भांत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यापारी टीकमसिंह राव यांच्या कंपनीत अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती आयकर विभागाला मिळाली होती. मात्र याप्रकरणाची चौकशी केल्यावर ती माहिती खरी असल्याची आढळली आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या टीमने राजस्थान महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये छापेमारी केली आहे.
Income Tax Raid l 18 कोटींचं सोन जप्त :
यावेळी आयकर विभागाने गुजरातमधील 2 ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी तर राजस्थानमधील बांसवाडा येथील तीन ठिकाणी याशिवाय जयपूरच्या विश्वकर्मा इंडस्ट्रियल एरियामध्ये एका ठिकाणी आणि उदयपूरमधील 19 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
दरम्यान, उदयपूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक टिकम सिंग यांच्या 19 वेगवेगळ्या ठिकाणी झडती आयकर विभागाने केली. यावेळी पथकाने हिरण माग्री सेक्टर-13 येथील घरातून 18 कोटींचे तब्ब्ल 25 किलो सोने जप्त केले. तसेच या झडती दरम्यान 8 लॉकर्सचे रेकॉर्ड देखील सापडले आहेत.
News Title : Income Tax Raid 23 locations across the country
महत्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख व ठिकाण ठरलं; कधी होणार?
राज्यातील 22 उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय; फेर मतमोजणी होणार?
आज शनि अमावस्येला घरात सुख-समृद्धीसाठी ‘हे’ उपाय करा!
सर्वात मोठी बातमी! राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली
राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण