देश

राजस्थानात सर्वांत मोठी छापेमारी; ‘इतक्या’ कोटींचा काळा पैसा जप्त

जयपूर | जयपूर येथे सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली. त्यात कोट्यवधींचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे.

जयपूर येथे एका सर्राफा व्यापारी यांच्याकडे एक भूयार सापडलं आहे. यात तब्बल 700 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे.

यकर विभागाची ही कारवाई पाच दिवस चालली. यामध्ये 50 पथके आणि 200 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

तीन मोठे व्यवसायिक समूह सिल्व्हर आर्ट ग्रुप, चोरडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुप यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये 1700 ते 1750 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे उघडकीस आले आहे. यासह किमती वस्तू, मूर्ती, महागडी रत्ने, वस्तू या भूयारातून सापडल्या आहेत, असं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनंदन!!! महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

घेतलं बरं का मिटवून…. त्या चिमुकल्यांच्या भांडणाचा अखेर गोड शेवट, पाहा व्हिडीओ-

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शनमध्ये; ‘या’ चॅनेलवर केली मोठी कारवाई

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या