अविनाश भोसले, विश्वजित कदमांवर आयकर विभागाची छापेमारी

पुणे | नामांकित उद्योजक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकलाय. भोसलेंसह त्यांचे जावाई आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत.

आयकर विभागाचे कर्मचारी सध्या दोघांच्या कार्यालय आणि निवासस्थांनांची चौकशी करत आहेत. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतल्याचीही माहिती आहे. 

दरम्यान, अविनाश भोसले आणि विश्वजित कदम यांच्यावर छापेमारी का करण्यात आली, हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या