मुंबई | राज्यात आज दिवसभरात 4 हजार 92 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. तर, 1 हजार 355 जण कोरोनातून बरे झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 19 लाख 75 हजार 603 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.7 टक्के झालं आहे. तर राज्यात एकूण 35 हजार 965 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 20 लाख 60 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले, तर 51 हजाराहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या शहर उपनगरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. शहर, उपनगरात एकूणच कोरोनावाढीचा दर आणि दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
दरम्यान, राज्यातील आणि मुंबईतील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर आज पूजा जिवंत असती’; पूजाच्या आजोबांची भावूक प्रतिक्रिया
“संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका, आमच्या पूजाचे कोणासोबतही संबंध नव्हते”
“पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख गप्प का?”
“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”