बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टेंशन वाढलं! देशात मंकीपॉक्सचा आणखी एक रूग्ण आढळल्याने खळबळ

नवी दिल्ली | भारतात मंकीपॉक्सचे(Monkeypox) रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर रविवारी दिल्लीत देखील मंकीपॉक्सचा एक रूग्ण आढळून आला. त्यापाठोपाठ आता तेलंगणातील(Telangana) एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत. हा व्यक्ती नुकताच परदेशातून भारतात परतला होता. तो आजारी पडल्यावर त्याला मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्याने त्याचा चाचणी अहवाल  पुणे येथे ‘राष्ट्रीय विषाणु संस्था'( NIV) येथे पाठविण्यात आला आहे.

केरळनंतर दिल्ली (Delhi) आणि आता तेलंगणामध्ये संशयित मंकीपॉक्सचा रूग्ण आढळल्याने भारतात चिंतेचे वातावरण झाले आहे. नागरिकांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. रूग्ण वाढतच असल्याने आता आरोग्य यंत्रणाही सतर्क होत आहेत. प्रत्येक राज्यातील आरोग्य विभागाने देखील आता जागृक राहायला हवे.

दिल्लीत आढलेल्या व्यक्तीचे वय 31 वर्ष आहे. त्याचा परदेशाचा प्रवास देखील झाला नव्हता तरी देखील त्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्या व्यक्तीला सुरवातीला ताप आला. नंतर त्याला चेहऱ्यावर जखमा झाल्या. मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्याने त्याची टेस्ट करण्यात आली, दरम्यान त्या व्यक्तीचा अहवाल(Report)पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता केरळ पाठोपाठ दिल्लीची चिंताही वाढली आहे.

दरम्यान, कोरोनानंतर महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने देखील तोंड वर काढले आहे, त्यातच आता भारतात मंकीपॉक्सचे रूग्णही आढळत आहेत. मंकीपॉक्स एक संसर्गजन्य आजार आहे. पॉझिटीव्ह व्यक्ती शिंकला, खोकला तर मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो. तसेच एखाद्या प्राण्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला असेल आणि तो प्राणी माणसाच्या संपर्कात आला तरी देखील माणसांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभाग(Health Department) सर्वांना काळजी घेण्याचे अवाहन करीत आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर

15व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मूंनी घेतली शपथ, सर्वोच्चपदी झाल्या विराजमान

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More