Top News महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप करत भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांंनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात सोमय्या यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून ही संपत्ती लपवल्याचा दावा केला आहे. आम्ही ही तक्रार निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे केली असून, ही तक्रार निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठवण्याचं बलदेव सिंह यांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने जप्त केलेली 78 एकर जमीन, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची भागिदारी असलेली महाकाली गुंफेची जमीन बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव, मुंबई महापालिकेने दहिसर येथील 2.55 कोटीचा भूखंड बिल्डरला 349 कोटीला दिला, पाच हजार बेडवाल्या 12 हजार कोटीच्या रुग्णालयाच्या घोटाळ्याचे पुरावे मिळाल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!

कौतुकास्पद! चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी तयार केली 4 भाषांमध्ये डिक्शनरी

भंडारा आग प्रकरण; त्यानं जीवाची बाजी लावली नसती तर आणखी मोठा अनर्थ…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या