मुंबई | भारतात गेल्या 24 तासांत कोरोना (Covid – 19) विषाणूची बाधा झालेली नवीन 20,000 प्रकरणे समोर आली आहेत. तर गेल्या 24 तासांत या कोरोना विषाणूमुळे 36 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरातून 20,279 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर देशातील एकूण संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,38,88,755 एवढी झाली आहे.
या वाढत्या संख्येने प्रशासनाची झोप उडविली आहे तर नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत देशात 5.26 लाख लोकांनी कोरोनाच्या आजारामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health and Family Welfare) आकडेवारीनुसार, देशात आताच्या घडीला 1,52,000 कोरोनाचे संक्रमित रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या प्रादुर्भावातून 18,143 लोकांची मुक्तता झाली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांचा आकडा आता 4,32,10,522 वर पोहोचला आहे.
दरम्यान, भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या प्राप्त माहितीनुसार देशातील कोरोनामुक्तीचा दर आता 98.45 टक्के झाला आहे. तर मृत्यू दर आता 1.20 आहे. भारतात आजच्या दिवसापर्यंत एकूण 5,26,033 रुग्णांनी कोरोनामुळे आपला प्राण गमाविला आहे.
थोडक्यात बातम्या –
‘मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती’, दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा!
‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा
काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले
Comments are closed.