पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. पुणे शहरातही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असून पालिका प्रशानसनाने नागरिकांना काळजी घेण्यातं आवाहन केलंय.
पुण्यामध्ये आज दिवसभरात 1086 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 795 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
पुण्यात सध्या 321 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,10,169 इतकी आहे. तर पुण्यात 723 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4903 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,98,246 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6090 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅंण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन एका गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे-पिंपरीचिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातील एमसीसीआयएमचे मेंबर्सचा समावेश आहे.
दिवसभरात नवे १ हजार ०८६ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने १ हजार ०८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख १० हजार १६९ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 9, 2021
दिवसभरात ७९५ रुग्णांना डिस्चार्ज !
शहरातील ७९५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ९८ हजार २४६ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 9, 2021
टेस्टींगचा १२ लाखांचा टप्पा पार !
पुणे शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ०९० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १२ लाख ०४ हजार ६२६ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 9, 2021
गंभीर कोरोनाबाधितांची संख्या ३२१ !
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ७ हजार ०२० रुग्णांपैकी ३२१ रुग्ण गंभीर तर ७२३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 9, 2021
नव्याने ६ मृत्युंची नोंद !
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ९०३ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 9, 2021
थोडक्यात बातम्या –
…म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिल्या ‘अमित शहा खुनी है’ अशा घोषणा!
मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा देवेंद्र फडणवीस कशी करू शकतात – अनिल देशमुख
खासदार नुसरत जहाँ यांच्या ‘त्या’ खास टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार, वैज्ञानिकांनी विकसित केले नवे उपचार!
लस देण्यासाठी नर्सने हात लावला की पोलीस कर्मचाऱ्याला आवरेना हसू, पाहा व्हिडीओ
Comments are closed.