नवी दिल्ली | दहा दिवस उलटले असले तरी रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचा थेट परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असताना कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असताना भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत.
मुंबईत शनिवारी प्रति लिटर पेट्रोलसाठी 109.98 रूपये तर डिझेलसाठी 84.24 रूपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 95.41 रूपये प्रति लिटर आहे तर डिझेल 86.67 रूपये प्रति लिटर दराने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोलचे दर 101.40 रूपये प्रति लिटर तर डिझेल 91.43 रूपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, देशात गेल्या 122 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर असले तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मायदेशी परतण्यासाठी नागरिकांना वाट मोकळी, रशियाने घेतला मोठा निर्णय
मेडिकल शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे”
संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही…
“हाताची घडी तोंडावर बोट याचं मोठं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे”
Comments are closed.