नागपूर | राज्यात सुरु असलेल्या आणि आगामी काळात होऊ घातलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी सांड पाणी साचलं आहे. तसेच नद्या आणि तलावांमध्ये पावसाचे गढूळ पाणी गेल्याने रोगराई आणि आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. याचमुळे आता शहरी भागांत अतिवृष्टीमुळे डेंग्यू आणि इतर किटकजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे काळजीचे आवाहन नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
डेंग्यूसोबतच उलट्या होणे, ताप येणे, अंगावर पुरळ उठने, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असं पालिका प्रशासनाने सांगितले आहे. या रोगांवरील नियंत्रणासाठी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. याच्या नियंत्रणाखाली प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.
जनजागृती, औषध फवारणी, सर्वेक्षण, धूर फवारणी, कुलर आणि पाण्यांच्या टाक्यांत औषधे टाकणे आणि गप्पीमासे पाळणे आदी उपाययोजना महापालिका करत आहे. शहरात डेग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परीसरात आणि घरात स्वच्छता राखणे आणि वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे आदी आवाहन पालिकेच्या हिवताप आणि हत्तीरोग विभागांमार्फत करण्यात आली आहे.
डेंग्यू हा आजार डेंगी विषाणूमुळे होतो. एडिस इजिप्टाय या मादी डासाने चावल्यावर डेंग्यू होतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, घरात किंवा घराबाहेर भंगार साहित्य साठू न देणे, लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे घालावेत यांसारख्या उपाययोजनांमुळे डेंग्यू पसरत नाही.
थोडक्यात बातम्या –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग
अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती
उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!
सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
अभिनेता महेश बाबूनंतर अल्लू अर्जुनचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…
Comments are closed.