मुंबई | दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली. यादरम्यान त्यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आलं होतं. आता नवाब मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पहायला मिळत आहे.
नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एकीकडे मलिकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर दुसरीकडे त्यांच्या मुलाला ईडीनं समन्स बजावला आहे. त्यामुळे आता पुन्हा मलिकांच्या अडचणींत वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे.
नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिक यांना ईडीनं समन्स बजावला आहे. नवाब मलिकांना डिस्चार्ज मिळताच मुलाला समन्स बजावल्यानं मलिकांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी पहायला मिळाल्या.
थोडक्यात बातम्या –
…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले
तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; चक्क गटारीत ओतला रशियन व्होडका, पाहा व्हिडीओ
‘नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती’; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य
युक्रेनच्या संरक्षणासाठी ‘ही’ सुंदरी उतरली मैदानात, पाहा फोटो
“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणलंय, फार मोठा तीर नाही मारला”
Comments are closed.