बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे अनेक दिवसांपासून एनसीबी (Narcotics control bureau) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wanghede) आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत आहे. रोज नवनवीन गौप्यस्फोट करत ते राजकीय वर्तुळात खळबळ माजवत असतात. अशातच त्यांनी अभिनेत्री आणि समीर वानखेंडेंची पत्नी क्रांती रेडकर यांचे काही चॅट शेअर केले होते. आता त्या चॅटवरुन नवा वाद सुुरु झाला आहे.

नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या (Kranti Redkar) चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले होते. कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या एका व्यक्तीनं नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संबंधीत पुरावे असल्याचं क्रांती रेडकरला सांगितलं होतं. तर हे पुरावे दिले तर बदल्यात तुला बक्षीस दिलं जाईल, असा मेसेजही क्रांतीनं केला असल्याचं या चॅटमध्ये दिसत आहे. पुढे कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीनं नवाब मलिक आणि राज बब्बर यांचा फोटो पाठवला. राज बब्बरची बायकोही त्यांना लाडाने दाऊद म्हणते असं त्यानं म्हटलं.

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या या स्क्रिनशाॅटवरुन आता क्रांती रेडकर यांनी मुंबई पोलिसात (Mumbai Police) ऑनलाईन तक्रार केली आहे. यामध्ये क्रांती रेडकरनं म्हटलं की, नवाब मलिकांनी शेअर केलेल्या चॅटची पडताळणी न करता चुकीचे ट्विट केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी क्रांती रेडकरनं केली आहे.

दरम्यान, माय गॉड! सकाळी सकाळी काय जोक मिळाला, आनंद घ्या. सर्वांचा दिवस चांगला जावो, असं कॅप्शन देत नवाब मलिक यांनी हे स्क्रीनशाॅट शेअर केले आहेत. यामुळे आता वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळत आाहे.

 

थोडक्यात बातम्या  – 

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

तळीरामांची चिंता वाढली, दारू विकत घ्यायची असल्यास आता…

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More