बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; कार्टानं याचिका फेटाळली

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात काही दिवसापुर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. आता पून्हा एकदा राज कुंद्राला न्यायालयाचा झटका बसला आहे.

अश्लील व्हिडीओ प्रकरणात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज कुंद्रा आणि रयान थोरपे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जस्टिस ए.एस. गडकरी यांनी निकाल देत म्हटलं की, मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट द्वारे ताब्यात घेणं कायद्याला अनुसरून आहे. यात कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नाही. तेव्हा आता राजला आणखी काही काळ जेलमध्येच रहावं लागणार आहे.

राज कुंद्रानं त्याला केलेली अटक बेकायदेशीर आहे असं म्हणत त्याच्या वकिलांद्वारे न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टानं यावर लगेच निकाल न देता 2 ऑगस्टपर्यंत रोखून ठरलं होतं. आज अखेर याविषयी निकाल दिला असून राज कुंद्राच्या अडणींत पुन्हा वाढ होणार आहे.

दरम्यान, राज कुंद्रा प्रकरणात अजूनही अनेक धागेदोरे समोर येत असून हे प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे. नुकतंच या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राची 8 तास चौकशी करण्यात आली आहे. आता आणखी या प्रकरणात काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात गॅस गळती; रूग्णांना तातडीनं बाहेर काढलं

अखेर प्रतिक्षा संपली!; ‘बिग बाॅस 15’ च्या घराची पहिली झलक आली समोर, पाहा व्हिडीओ

“MPSC आयोगावर सर्वच मराठा सदस्य; विदर्भातील ओबीसी सदस्य घ्या”

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त; अखेरच्या रूग्णाला मिळाला डिस्चार्ज

लग्न झालं अन् तिसरीनेच धरला नवरदेवाचा हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More