बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मुंबई | भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. गिरीश चौधरी यांना ईडीने 5 जुलैला अटक केली होती. ईडीच्या मागणीनंतर गिरीश चौधरी यांना 15 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

चार वेळा ईडीच्या कोठडीत असलेल्या गिरीश चौधरी यांना आता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 6 जुलैपासून ईडीच्या कोठडीत असलेल्या गिरीश चौधरींना मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी न्यायालयात जामिनासाठी एक अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गिरीश चौधरी यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्याचबरोबर मला राजकीय षडयंत्रातून बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा आरोप त्यांनी अर्जात केला आहे. तर आपल्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गंत कारवाई होऊच शकत नाही, असाही दावाही त्यांनी केला आहे. अॅड मोहन टेकावडे यांच्यामार्फत त्यांनी हा अर्ज केला आहे.

दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती. सदरील जमिनीचे 37 लाख एवढे मुद्रांक शुल्कही भरण्यात आलं होतं. सर्व प्रक्रियेनंतर ही जमीन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं पुढे आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“पेगॅससचे खरे बाप देशातच”; सामनातून शिवसेनेची ‘ही’ आक्रमक मागणी

“तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?”

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

‘कोरोना को मत डरो ना…’; रामदास आठवलेंच्या कवितेनं राज्यसभेत एकच हशा

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More