बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात लाॅकडाऊनमध्ये 1 जूनपर्यत वाढ ‘ही’ आहे नवी नियमावली 

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारकडून नवीन नियमावली आज जारी करण्यात आली आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते. त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता त्यात आणखी एक दिवस वाढवला आहे. या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

अशी आहे नियमावली

1. किराणा दुकाने – सकाळी 7 ते 11

2. दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री – सकाळी 7 ते 11

3. भाजीपाला विक्री – सकाळी 7 ते 11

4. फळे विक्री – सकाळी 7 ते 11

5. अंडी,मटण, चिकन,मासे विक्री – सकाळी 7 ते 11

6. कृषी संबंधित सर्व सेवा, दुकाने – सकाळी 7 ते 11

7. पशूखाद्य विक्री – सकाळी 7 ते 11

8. बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने – सकाळी 7 ते 11

9. पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने – सकाळी 7 ते 11

10. येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने – सकाळी 7 ते 11

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारनं 5 एप्रिल 2021 रोजी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर नियम लागू केले. त्यानंतर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील माहिती दिली आहे. लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंंत्री जाहीर करतील, असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या

“डोळ्यावरील गुलाबी चश्मा उतरवावा, मोदींना ‘सेंट्रल विस्टा’ शिवाय काहीच दिसत नाही”

सलग पाच वर्ष विराट कोहली अँड टीमनं केला नवा विक्रम; मात्र, न्यूझीलंडकडून धोका

अजित पवारांना ‘या’साठी हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी त्यासाठी करणार इतके कोटी खर्च

पुणे जिल्ह्यातील कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली; प्रशासनाच्या चिंतेत भर

धोनीच्या संघातील ‘हा’ खेळाडू बनणार भारतीय संघाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More