बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्यातच कच्च्या तेलाचा दर गेल्या दोन महिन्यात 7 टक्क्यांनी वाढला आहे. तरीदेखील निवडणुकांचं वारं वाहत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. मात्र आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या असं सध्या बोललं जात आहे. त्याबरोबरच, 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हते. त्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ झाली पण देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने किंमती मात्र वाढवण्यात आल्या नाही.

जवळपास 66 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते, तर गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीला सुरुवात झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात 52 पैसे तर डिझेलच्या दरात 30 पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर हा 97.34 रुपये प्रति लिटर दर डिझेलचा दर हा 88.49 रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे. त्यामुळे आता परत एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

कच्च्या तेलाचे दर हे 8 डॉलरने वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर त्याचा थेट परिणाम होणार हे निश्चित होतं. मागील दोन महिन्यात 7 टक्क्यांनी कच्च्या तेलाचा दर वाढून प्रती बॅरल 4874.52 रुपये एवढा झाला असल्याचं तेल वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याबरोबरच, कच्च्या तेलाचे दर जर कमी नाही झाले तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढत जातील आणि मागच्या काळात झालेला तोटा या दरवाढीतून भरून काढला जाईल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

चिंता वाढली! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली फक्त”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More