बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ?, वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोना महामारीचं सावट देशभरात घोंगावत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे. ओमिक्राॅननं देशात चिंतेचे वातावरण निर्माण केलं आहे. यातच वाढत्या इंधन दरानंही(Fuel Rate) नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे.

कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत.

आज 7 डिसेंबर रोजी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये आज 1 लीटर पेट्रोलचा भाव 103.93 रुपयांवरून कमी होऊन 95.41 रुपये प्रति लीटर झाला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटत असल्याने देशांतर्गत किमतीही घटण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

Omicron | ‘आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी आणि भयानक साथ येणार’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

धक्कादायक! Omicron चा लहान मुलांना जास्त प्रमाणात धोका

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More