मुंबई | गेल्या वर्षीच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 12 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही माहिती समोर आली आहे.
30 जून रोजी पंतप्रधान मोदींची संपत्ती 2.85 कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 36 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती 2.49 कोटी रुपये होती.
दरम्यान, मोदींच्या बँक खात्यात 3.3 लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची 33 लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचे आदेश
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 73 लाखांच्या पुढे
पुण्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चार तरुण वाहून गेले!
“राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसं वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलंय”