बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?, ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना गेल्या रविवारी ईडीकडून(ED) अटक करण्यात आले आहे. पत्रा चाळ घोटाळणाप्रकरणी  त्यांना सोमवारी न्यायालयातही हजर करण्यात आले होते. ईडीच्या आणि संजय राऊतांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. गुरूवारी ही कोठडी संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले.

चौकशी दरम्यान ईडीच्या हाती रविवारी राऊतांच्या निवास्थानी काही महत्त्वाची कागदपत्रे लागली होती. त्या कागदपत्रानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यानुसार तीन कोटी रोख रक्कम देऊन राऊतांनी अलिबाग येथे दहा ठिकाणी जमीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे राऊतांची ईडी कोठडी वाढण्याची शक्यता आहे.

एका वृत्तसंस्थंने दिलेल्या माहितीनुसार, राऊतांना प्रविण राऊतांकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. हाच पैसा राऊतांनी मुंबई आणि अलिबाग येथे फ्लॅट घेण्यासाठी वापरला आहे, असा दावा ईडीने केला आहे.

प्रविण राऊत(Pravin Raut) यांना म्हाडाच्या पात्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी संजय राऊतांमुळे मिळाले होते.या व्यवहारात राऊतांना प्रविण राऊतांकडून मोठी रक्कम मिळाली का, या हिशोबाने ईडी अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे, त्यामुळे राऊतांची ईडी कोठडी वाढवून मिळावी, यासाठी ईडीकडून न्यायलयात मागणी होऊ शकते. दरम्यान शिंदे गट आणि  शिवसेना यांची सुनावणी न्यायालयात सुरू असून निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची प्रतिक्षाही सर्वांना लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी

…अन् उर्फीने कपड्यांऐवजी चक्क गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

शिंदे गटाचा तो आरोप खोटा?, शिवसेनेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More