RBI चा सर्वसामान्यांना धक्का, घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली | हल्ली सगळ्यांनाच त्यांची स्वप्न पूर्ण करायची असतात. अनेक नवीन गोष्टी आपल्याला घेण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेक वेळा आपण लोन घेण्याचा विचार करतो. त्यासाठी बँक आपल्याला कर्ज देण्यास तयार असतात. मात्र आता कर्ज (loan) घेणाऱ्यांची देखील चिंता वाढली आहे.
सध्या वाढता जीएसटी (GST), वाढती महागाई आणि येत्या नवीन वर्षात गॅसचे दर देखील वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं आता मुश्किल झालं आहे. अशातच आता बँकेनेही त्यांना एक धक्का दिला आहे.
अनेकदा आपण लोन घेतो मात्र आता लोनवरच व्याजदर वाढणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो दरात वाढ केल्याने कर्ज देणाऱ्या बँकानी त्यांच्या व्याजदरात वाढ करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे सामान्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी देखील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार वेळा रेपो दरात (Repo rate) वाढ केली होती. त्यात आता पुन्हा एकदा रेपो दर वाढणार आहे. त्यामुळे EMI आणि लोन घेणाऱ्यांचे हप्ते वाढणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 0.25 ते 0.35 टक्के रेपो दर वाढवण्याची शक्यता आहे. आता पुन्हा फेब्रुवारीमध्ये (February) रेपो रेट वाढेल असे संकेत देण्यात आले आहेत. या आर्थिक वर्षात रेपो रेट 6.5 टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इंडिया रेटिंग्ज अॅड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ (Economist) डी.के पंत यांच्या म्हणण्यानुसार, महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात 0.25 टक्क्यांनी रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोन घेणाऱ्यांची चिंता वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.