बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

नागपूर | शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे करण्यात आली होती. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यवतमाळमध्ये अशा प्रकारची तक्रार आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काल संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

महिलेने शरिरसुखाची मागणी केल्याचा आरोप केल्यानंतर संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आता या प्रकणाची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. यवतमाळचे पोलीस अधिक्षक दिपक भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषद घेतान खुद्द संजय राठोड यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात सायबर सेलची देखील मदत घेतली जाणार आहे. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. राजकारणात विरोध केल्यानं माझ्यावर हे आरोप होत आहेत. माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप संजय राठोड यांनी केला होता.

दरम्यान, संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैगिंक छळ करतो, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. संस्थेत काम मिळावं यासाठी असा आरोप माझ्यावर केला जात असल्याचं संजय राठोडांनी सांगितलं होतं. आता या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केल्यानंतर आता चौकशीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंकजा मुंडेंवर आरोप करून शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम सत्ताधारी करतायेत”

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट

कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More