मोठी बातमी! संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ

मुंबई | ‘विधीमंडळ नव्हे चोर मंडळ’ असं वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. संजय राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदार आक्रमक झाले होते. त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती.

आमदारांच्या मागणीनंतर समितीची स्थापना करण्यात आली. संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र राऊत यांनी या नोटीसीला लेखी उत्तर न दिल्यानं आता राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) हे राज्यसभेचे खासदार असल्यानं राज्यसभेचा मान राखण्यासाठी आता हे प्रकरण केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांकडून हे प्रकरण आज विशेष  अधिकार समितीकडे वर्ग होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-