बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरूख खानच्या अडचणीत वाढ! ‘या’ जवळच्या व्यक्तीला एनसीबीनं बजावलं समन्स

मुंबई | सध्या देशभर ड्रग्ज प्रकरण खूप गाजत आहे. सिनेअभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीनं एका क्रूझवरून ताब्यात घेतलं होत. यानंतर राज्यातील वातावरण खूप तापलेलं आहे. ड्रग्ज आणि बाॅलिवूड यांच्याविषयी सर्वत्र चर्चा आहे. एनसीबी न्यायालयानं आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता जून एक मोठी घडामोड याप्रकरणात घडली आहे.

आर्यन खानच्या गाडीच्या चालकाला एनसीबीनं समंन्स बजावलं आहे. या प्रकरणाला आता वेगळं वळण येताना पहायला मिळत आहे. एनसीबीच्या कारवाईला राजकीय कारवाई म्हणत राष्ट्रवादीनं भाजपवर जोरदार टीका केली आहे.

आर्यन खानच्या चालकाला एनसीबीनं चौकशीला बोलावल्यानं आता अजून काय नवीन माहिती मिळणार याकडं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर जोरदार टीका केली आहे. आर्यन खान याच्यावरील कारवाई म्हणजे बाॅलिवूडला बदनाम केलं जात आहे, अशी टीका मलिक यांनी केली होती.

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईनं पुन्हा एकदा ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जवळपास 3 हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. हे प्रकरण शांत होत नाही तोवर बाॅलिवूडला पुन्हा ड्रग्ज प्रकरणानं घेरलं आहे. त्यामुळे आता येत्या काळात देखील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

चिपी विमानतळावर राजकीय राडा; उद्धव ठाकरेंनी राणेंना मारले इतके टोमणे!

“शिवसेनेतील ‘या’ नेत्यांवर नजर ठेवा”; भरसभेत राणेंचा उद्धव ठाकरेंना खळबळजनक सल्ला

“कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्यात”; पहिल्याच वाक्यात ठाकरेंचा प्रहार

“नजर लागू नये म्हणून काळं तीट लावावं लागतं, ती लावणारी लोकं इथं आहेत”

“लघू-सूक्ष्म का असेना तुमच्याकडे मोठं खातं”; उद्धव ठाकरेंकडून राणेंना कानपिचक्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More