बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आता आणखी एका आरोपामुळे चर्चेत

मुंबई | सध्या चर्चेत असलेलं अश्लील व्हिडीओ प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक झाल्यापासून अनेक धागेदोरे समोर आले आहेत. पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणि कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अशातच आता शिल्पाच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचं समोर येत आहे.

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली. पहिलंच पतीच्या प्रकरणामुळे तिच्यावर अनेक आरोप केले जात असताना आणखी एका आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. आता शिल्पा आणि तिच्या आईवर आर्थिक फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. 

शिल्पानं आयिसिस नावाची स्लिमिंग स्किन सलून व स्पा कंपनी सुरु केली होती. या कंपनीच्या ब्रांच संपूर्ण देशात असाव्या अशी शिल्पाची इच्छा होती. अशीच एक ब्रांच ती लखनऊमध्येही देखील सुरू करणार होती. मात्र या प्रोजेक्टमध्ये तिनं कोट्यवधींची फसवणूक केली असा आरोप तिच्यावर केला जात आहे. या प्रकरणाची आता पोलीस चौकशी होणार आहे.

दरम्यान, शिल्पावर आरोप करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव ज्योत्सना चौहान आणि रोहित वीर सिंह असून त्यांनी शिल्पाविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. राज कुंद्रा प्रकरणात अनेकजण पुढे येत धक्कादायक खुलासे करत आहेत. त्यामुळे तो अजून वादाच्या भोवऱ्यात गुंतत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

दिल्लीत खलबतं सुरुच; देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ हजार पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक; आज ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाच्या बहिणीची बिग बाॅसमध्ये एंट्री, पाहा व्हिडीओ!

“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More