बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोफत ‘शिवभोजन’ थाळीच्या मुदतीत केली वाढ; मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

मुंबई | राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 14 जूनपर्यंत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. अशातच आता ‘शिवभोजन’ थाळीची ही मुदत वाढवण्यात आली आहे.

राज्यातील गरीब जनतेला मोफत ‘शिवभोजन’ थाळीची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्यानं मंजूर केलेल्या 441 केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. आजघडीला राज्यात एकूण 1043 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.

दरम्यान, शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 15 एप्रिल ते 17 जून या काळात 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी 70 लाख 18 हजार 184 थाळ्यांचे वितरण झाले आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

“निलेश राणे, नितेश राणे काहीच करू शकत नाही, कोणामुळे मोठे झालात हे विसरू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More