बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद आता भारतात देखील उमटायला सुरूवात झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान 1 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.

एलपीजी सिलेंडरचे दर तब्बल 105 रूपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली असून घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलेंडर देखील महाग होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 105 रूपयांनी वाढ करण्यात आल्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत 19 किलोंच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1857 ऐवजी 1963 रूपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर 2012 रूपयांना मिळणार आहे.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झाली नसली तरी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर व कच्च्या तेलाच्या किंमतीत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

अमेरिकेकडून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, भडकलेल्या पुतिन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“डॉक्टर नालायक हरामखोर आहेत, ते मारखाण्याच्या लायकीचे आहेत”

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पंढरपुरात महावितरणला साप भेट

“ह्रदयाचे ठोके वाढले आहेत, आशा आहे की..”; अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More