बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांचं टेन्शन वाढलं! आता ईडीचं पथक नाशकात धडकलं, चौकशी सुरू

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड कुटूंबियांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचा भंगारव्यवसाय देखील आहे. त्यातच आता नवाब मलिक यांच्या भंगार व्यवसायाशी संबंधित चौकशी करण्यासाठी ईडीने नाशिकला धडक मारली आहे.

नाशिक येथील भंगार व्यवसायाशी संबंधित लोकांची ईडीकडून चौकशी सुरू आहे, अशी माहिती समोर येत आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती माध्यमांना देण्यास सदर यंत्रणांनी नकार दिला आहे. नवाब मलिकांच्या भंगार व्यवसायाशी निगडीत अनेकांची चौकशी केल्याची देखील माहिती आहे. नाशिकमध्ये ईडीने चौकशी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकिलाच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. नाना पटोले यांचे वकिल सतिष उके आणि भाऊ प्रदीप उके यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या अतिरेकी कारवाया थांबवाव्यात, असं म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांची अंडरवर्ल्डशी निगडित मालमत्ता आहे का?, यासंदर्भात ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर सध्या ईडीच्या कोठडीत आहे. ईडीने या प्रकरणात दोन बिल्डरांना समन्स पाठवले आहे. त्यातच नवाब मलिकांच्या व्यवसायाशी संबंधित अनेक व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

महागाईवर प्रश्न विचारताच बाबा रामदेव भडकले, व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर नाराजी, शरद पवारांकडे केली तक्रार?

आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रशियाने भारताला दिली ‘ही’ खास ऑफर

“…पण आम्ही देश वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”

“भविष्यात नाना पटोलेंवरही धाडी पडल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More