बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाची चौथी लाट आली?, धडकी भरवणारी आकडेवारी समोर

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या (Covid – 19) रुग्णांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा समजली जाते आहे. आज सलग चौथ्या दिवशी सुद्धा 20 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाकडून (Indian Health Ministry) प्राप्त माहितीनुसार मागील चोविस तासांत कोरोनाचे 20,528 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

आढळलेल्या रुग्णांपैकी 49 (Died) जणांनी आपला जीव गमावला आहे. हा मृतांचा आकडा जरी कमी असला तरी आगामी काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर एक दिलासादायक वृत्त देखील समोर येत आहे. आढळून आलेल्या रूग्णांपैकी 17,790 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संख्येनुसार अॅक्टिव केसेसची संख्या सुद्धा वाढत आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत अॅक्टिव केसेसची (Active Cases) संख्या 2,689 ने वाढली आहे. याचबरोबर आता एकूण अॅक्टिव रुग्ण संख्या 1,43,449 झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच भारत सरकार (Government of India)  नागरीकांना लस देण्याचे प्रमाण देखील वाढवत आहे. भारत सरकारने राष्ट्रव्यापी लसीकरण अभियान सुरु केले आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 199.98 कोटी लस (Vaccine) दिल्या गेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ठाकरे-शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यामागे भाजपची ‘ही’ मोठी खेळी?

सुष्मितासोबतच्या नात्याची कबूली दिल्यानंतर ललित मोदी ‘या’ कारणामुळे माध्यमांवर संतापले, म्हणाले..

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More