बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के; ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत लीगचा पाचवेळेचा विजेता मुंबई इंडियन्स संघ यावर्षी मात्र निराशजनक कामगिरी करत आहे. मुंबईनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक सलग सामने गमावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशातच मुंबईला आणखीन एक धक्का बसला आहे.

मुंबई संघाचा गोलंदाज मोहम्मद अर्शद खान हा दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. अर्शदला मुंबई संघात बुमराहच्या सोबतीनं कामगिरी करण्यासाठी खरेदी करण्यात आलं होतं. अर्शद हा वेगवान गोलंदाज म्हणून अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता होती.

अर्शदच्या जागी आता कुमार कार्तिकेय सिंहला बदली खेळाडू म्हणून संघात सहभागी करून घेण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या अर्शदला मुंबई संघानं 20 लाख रूपये खर्च करून मेगा ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं.

दरम्यान, अर्शदनं या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. मुंबई संघाच्या सलग 8 पराभवानंतर संघातील बदलामध्ये अर्शदला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा देखील रंगली होती.

थोडक्यात बातम्या – 

‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

शेलारांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”

“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More