बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढला!

मुंबई | राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत 31  जानेवारी 2021 पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी बुधवारी याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे.

लाॅकडाऊनचा कालावधी महिनाभरासाठी वाढविण्यात आला असला तरी ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत लागू करण्यात आलेल्या सवलती कायम असतील. तर प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू असलेले निर्बंध कायम असतील.

नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री 11 पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. रात्रीच्या जमावबंदीचेही आदेश लागू आहेत. रात्री 11नंतर सर्व आस्थापना बंद होणार आहेत.

रात्री घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर जाऊन औषधे आणणे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी केला मोठा खुलासा

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More