Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

Team India | भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशजनक बातमी आहे. टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघाच्या बाहेर आहे. याचं कारण म्हणजे त्याला झालेली दुखापत. वर्ल्ड कप दरम्यान शमीच्या पायाला दुखापत झाली होती. शमी अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. शमी संघाबाहेर असल्याने टीम इंडियाचं टेंशन वाढलं आहे.

मोहम्मद शमी संघाच्या बाहेरच

वर्ल्ड कपनंतर शमी एकही सामना खेळलेला नाही. शमीला आता आपल्या दुखापतीवर उपचारासाठी परदेशात जाव लागू शकत. सध्या शमी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीमधून बाहेर पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.

Team India | उपचारासाठी शमी लंडनला जाणार 

क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार, शमी स्पेशलिस्ट डॉक्टरांना भेटण्यासाठी लंडनला जाऊ शकतो. शमीच नाही वर्षभरापेक्षापण अधिक काळापासून टीम बाहेर असलेला ऋषभ पंत सुद्धा लंडनला जाऊ शकतो.

पटेल यांनी गुरुवारी शमीला गोलंदाजी करताना होणारी दुखापत तपासली. त्यानंतर शमीला लंडनच्या स्पेशलिस्टला दाखवण्याचा निर्णय घेतला.

क्रिकबजने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, बीसीसीआय ऋषभ पंतला देखील लवकरच लंडनला पाठवू शकतं. 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना पंतचा अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता.

गंभीर दुखापत झाली होती ज्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतबद्दल बातम्या आल्या होत्या की तो अफगाणिस्तान मालिकेतून पुनरागमन करू शकतो पण तसं झालं नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rashmika Mandanna | ‘मी जोरात ओरडले, रडले…’; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत रश्मिका मंदानाने केला खुलासा

Ram Mandir | पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने शेअर केले श्रीरामाचा फोटो, म्हणाला ‘माझा रामलल्ला…’

Ira Khan Wedding Teaser | आमिरच्या लेकीने शेअर केला लग्नाचा टीझर, पाहा व्हिडीओ

Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, ‘या’ ठिकाणी विराजणार भाऊ लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न

Ram Mandir | रामलल्लाची मूर्ती आली समोर; भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो