बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

नवी दिल्ली | देशात सरासरी कोरोनाबाधितांच्या (Covid Positive Patients)संख्येत वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत हा आकडा थोडा खाली घसरला होता त्यामुळे थोडे दिलासादायक चित्र होते. आता आजच्या प्राप्त माहितीनुसार कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 557 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच मागील 24 तासांत 40 कोरोनाबाधित रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

तसेच देशातील सरासरी आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 18 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशात 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आताच्या घडीला देशात 1 लाख 45 हजार 654 सक्रिय (Active Patients) कोरोनाबाधित आहेत.

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचा (Pune District) कोरोना रुग्णात सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आहेत. महाराष्ट्रातील गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नव्या 2,279 रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत 2,646 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील (Pune Municipal Corporation Zone) आहेत. गेल्या 24 तासांत पुणे महापालिका क्षेत्रात 441 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे

मुंबईत (Mumbai) देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुुरु आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत नव्या 284 रुग्णांंची भर पडली. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासन आणि नागरिक हैराण आहेत. तसेच प्राप्त आकडेवाडीनुसार मुंबईत गेल्या 24 तासांत 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

थोडक्यात बातम्या – 

शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला

मुळशी धरण परिसरात जमिनीला भेगा, नागरिक भयभीत

‘…तेव्हा फडणवीस रडायला लागले होते’, नाना पाटोलेंची टोलेबाजी

‘घोटाळे करायचे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…’,आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More